पिस्तूल चा धाक दाखवत अमळनेर जवळील पेट्रोल पंपावर लुटमार..

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर जवळील डांगर शिवारातील पांडूरंग पेट्रोल पंपावर कालरात्री सवा बारा चया सुमारास अज्ञात व्यक्तीने पिस्तुल चा धाक दाखवून ३६ हजार ५०० रुपये लुटून सोबत असलेल्या सहकार्याचा मदतीनें मोटर सायकल वर पसार झाला त्याने चेहरा काळ्या मफलर ने बांधलेला होता पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना पितुल दाखवत त्यांच्या जवळील हिसकावून घेतली त्याच वेळी एक चार चाकी गाडी पेट्रोल भराव्यास आली असता त्या पिस्तूल वाल्याने चारचाकी वाल्याला बाहेर निघण्यास सांगत पिस्तूल रोखून त्याच्या खिशातील पाकीट हिसकावत त्याला मारहाण केली नरेंद्र पवार याने अमळनेर पोलिसात फिर्याद दिल्याने दोन जणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांची रात्रीची पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी होत आहे.