थोर पुरुषांना डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात रिजवा- जयपाल हिरे..

जळगाव ( प्रतिनिधि)थोर पुरुष, दैवत व महापुरुष यांना धर्मामध्ये न वाटता तसेच त्यांच्या प्रतिकृती डोक्यावर न घेता त्या थोर महापुरुषांचे विचार डोक्यात घालून समाजात वावरा व समाजाचे भले करा तीच खरी श्रद्धांजली व जयंती त्या दैवतांना राहील असे भावनिक आवाहन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी शांतता समितीच्या बैठकीद्वारे उपस्थित सर्व समाजातील विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या तरुणाईला केले.
रामनवमी, रमजान ईद, बाबासाहेब आंबेडकर जयंती, व हनुमान जयंती इत्यादी सणाच्या निमित्ताने एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता समितीची बैठक एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली त्यावेळी जयपाल हिरे बोलत होते.
फारूक शेख तर्फे इस्लाम संस्कृती पुस्तके भेट
मुस्लिम मन्यार बिरादरीचे फारुक शेख यांनी प्रशासन व समस्त तरुणाई यांना विनंती केली की दोघी समाजातील सण एकमेकांच्या सोयी सवलती अनुसार आपण साजरे करूया, आमच्या उत्सवात दुसरे समाज बांधव उपस्थित झाल्यास तो आनंद अजून मोठा होईल म्हणून आपसात सुसंवाद साधून एकमेकांचे सामाजिक व धार्मिक वचनांचे देवाण-घेवाण होणे आवश्यक असल्याने त्यांनी उपस्थित हिंदू बांधवांना प्राथमिक स्वरूपात साने गुरुजी लिखित इस्लामी संस्कृती ही ५ पुस्तके भेट म्हणून दिले.
धर्माचा अभिमान बाळगा- रवींद्र पाटील
नगरसेवक रवींद्र घुगे पाटील यांनी सुद्धा आपले मनोगताद्वारे तरुणाईला धर्माचा अभिमान बाळगा धर्माचा अतिरेक करू नका असे आवाहन केले
यावेळी सर्व समाजातील तरुण या सभेला उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपनीय विभागाचे प्रवीण पाटील यांनी तर आभार मंदार पाटील यांनी केले.