एरंडोल नगरपालिका
मार्फत स्वच्छ उत्सव – 2023 अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन.

एरंडोल ( प्रतिनिधि ) एरंडोल नगरपालिका स्तरावर स्वच्छ भारत अभियान (नागरी) आणि दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान Day-Nulm कृती संगम अंतर्गत स्वच्छ उत्सव – 2023 च्या निमित्ताने स्वच्छतेतील महिलांकडून महिलांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री.विकास नवाळे यांनी उपस्थित असलेल्या महिला बचत गट सदस्यांना स्वच्छ शहर- कचरा मुक्त शहर याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महिलांकडून स्वच्छतेची हरित शपथ घेण्यात आली.
त्यानंतर स्वच्छता व कचरा मुक्त शहराचा प्रचार प्रसार करण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (Day-Nulm) अंतर्गत स्थापित महिला बचत गटांतील सदस्यांची नगरपालिका हॉल पासून जनजागृती रॅली काढण्यात आली सदर रॅली भगवा चौक, ब्राह्मण ओटा, पांडव वाडा, श्रीराम मंदिर, JDCC बँक मार्गे जून्या नगरपालिका जवळ सदर रॅलीची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र शिंदे ,डॉ. योगेश सुकटे, नोडल ऑफिसर हितेश जोगी,सिटी कॉर्डिनेटर विवेक कोळी, NULM विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी महेंद्र पाटील,समुदाय संघटक कुसुम पाटील यांनी परिश्रम घेतले.