अमळनेरात दोन गटात दगड फेक दंगलीचे गुन्हे दाखल…

0

अमळनेर (प्रतिनिधि)अमळनेर शहरातील कसाली मोहल्ला किल्ला चौक व भोईवाड्या जवळ दोन गटात मोटरबाइक च्या कट मारत जातीवाचक शीविगाढ च्या वाद वाढत त्याचे रूपांतर दगड फेकीत झाले

व दोन्ही जमावाने मोटरसायकली ,पथदिवे फोडले दगडफेकीत दोन पोलिसांना किरकोळ दुखापत झाल्याने १६ जणासह इतर ९ ते १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध सरकारी कामात अडथळा व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल गणेश सुरेश पाटील यानी फिर्याद दिली की 30 रोजी रात्री १० वाजता बंदोबस्तावर असताना तीन तरुण मोटरसायकलवर जाताना मोठयाने ओरडत होते त्याचवेळी तेथे हाजी सईद शेख अयुब , विशाल दशरथ चौधरी , काल्या उर्फ आबिदखान महंमद पठाण (रिक्षावाला) , अब्बासखान हुसेनखान पठाण , मुरली कोळी,प्रवीण नथु भोई , हनिफखान उर्फ मुक्या जहुरखान मेवाती , मुन्ना कोळी ,भूषण महाजन ,मनोज बबन ठाकरे, नसीब रहेमान पठाण ,साबीर ,गोलू यांचे पूर्ण। नाव माहीत नाही , तसेच रुपेश प्रकाश पवार ,धीरज रवींद्र शिंगाणे , चेतन कोळी रा कसाली मोहल्ला ,झामी चौक यांनी दगडफेक केली. त्यात गणेश पाटील व चरणदास याना दगड लागले. मोटरसायकली ,पथदिवे फोडण्यात आले. लागलीच पोलीस निरीक्षक विजय शिंदे ,एपीआय राकेशसिंग परदेशी , पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे ,उपनिरीक्षक विकास शिरोळे , पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ,हेडकॉन्स्टॅबल किशोर पाटील ,रामकृष्ण कुमावत , प्रमोद पाटील,मिलिंद भामरे ,संदेश पाटील ,शरद पाटील,रवी पाटील ,दीपक माळी , सिद्धांत शिसोदे ,नाजीमा पिंजारी ,नम्रता जरे यांच्यासह इतर पोलिसांनी घटनास्थळी जमावाला शांत केले.
गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रात्री पुलिस अधिक्षक एम,राजकुमार ने भेंट दी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!