राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अर्णव दीपक सोनवणेला मेडल…

0

अमळनेर (प्रतिनिधी) मनमाड येथे झालेल्या राज्यस्तरीय आमदार चषक कराटे स्पर्धेत अमळनेर येथील अर्णव दीपक सोनवणे याने चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचे नाव रोशन केले. 14 वर्षे वयोगटातील स्पर्धकांशी त्याची स्पर्धा झाली. अर्णव याने करंदीकर यांच्या मार्गदर्शनाने पहिल्याच प्रयत्नात मेडल प्राप्त केले. त्याच्या या यशाबद्दल पोलीस उपनिरीक्षक नृसिंह वाघ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी डीवायएसपी राकेश जाधव, संदीप घोरपडे उपस्थित होते. अर्णव सोनवणे यांच्या यशाबद्दल माजी आमदार गुलाबराव पाटील संस्था अध्यक्ष हेमकांत पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष डी. ए. धनगर व सर्व मित्र परिवाराने कौतुक केले आहे. त्याच्या या यशाबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!