इलेक्ट्रॉनिक्स विभागात “हँड्स ऑन ट्रेनिंग इन पावर सप्लाय मेकिंग ” ही कार्यशाळा उत्साहात संपन्न

अमळनेर (प्रतिनिधि ) प्रताप विद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागात “हँड्स ऑन ट्रेनिंग इन पावर सप्लाय मेकिंग” ही कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांनी केले. या कार्यशाळेला संस्थेचे सहसचिव प्रा. धीरज वैष्णव व अंतर्गत मूल्यमापन समितीचे प्रमुख डॉ. जयेश गुजराती मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. ए.बी. जैन यांनी अध्यक्षीय भाषणात या कार्यशाळेच्या आयोजनाचे महत्त्व विशद करताना म्हटले की, “अशा प्रकारच्या आयोजनातून प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कौशल्य विकास बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी महत्वाच्या ठरतात.”असे मत व्यक्त केले. या कार्यशाळेबद्दल इलेक्ट्रॉनिक्स विभागातील डॉ. मुकेश पी. भोळे, प्रा. वृषाली वाकडे, वैष्णवी पाटील व प्रा. कल्याणी पाटील यांचे यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले. एकूण ३० विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यशाळेत सहभाग घेतलेल्या दिव्या पाटील या विद्यार्थिनीने इलेक्ट्रॉनिक्स सर्किट बनवण्याची उपयुक्त अशी माहिती मिळाल्याबद्दल व अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल विभागाचे आभार व्यक्त केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी एस. बी. बाविस्कर, भगवान पाटील व पंकज भदाणे यांनी परिश्रम घेतले.