नाशिक विभागातून एकमेव अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान.. खासदार संजय राऊत यांच्या हस्ते सन्मान…

0

अमळनेर (प्रतिनिधि) मराठी पत्रकार परिषद मुंबई च्या वतीने कर्जत जामखेड येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यात अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघास स्वर्गीय वसंतराव काणे आदर्श पत्रकार तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करून सन्मानित करण्यात आले.


राज्यसभेचे खासदार तथा दैनिक सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांच्या शुभ हस्ते तथा कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार व मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी अमळनेर पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष चेतन राजपुत,उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर तसेच जेष्ठ पत्रकार संजय पाटील,किरण पाटील,महेंद्र रामोशे,आर जे पाटील,अमोल पाटील,युवराज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्थ किरण नाईक,अध्यक्ष शरद पाबळे,कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर,सरचिटणीस मन्सूरभाई शेख,कोषाध्यक्ष विजय जोशी,धुळे येथील परिषदेचे पदाधिकारी रोहिदास हाके,जेष्ठ पत्रकार गो. पि.लांडगे यासह असंख्य मान्यवर आणि राज्यातील बहुसंख्य तालुक्यातील पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.सदर मेळाव्यात खा.संजय राऊत,आ रोहित पवार आणि परिषदेचे एस एम देशमुख यांचे अनमोल मार्गदर्शन पत्रकारांना लाभले.
दरम्यान दोन महिने अधिच संपूर्ण नाशिक विभागातून एकमेव अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली होती,अखेर पत्रकारिता क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार अमळनेर पत्रकार संघास प्राप्त झाल्याने अमळनेर तालुक्यातील पत्रकारांनी आनंद व्यक्त केला.सदर पुरस्काराबद्दल संघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांचे सर्वत्र अभिनंदन होत असून सदरचा पुरस्कार अमळनेरचे सर्व पत्रकार बांधव व सतत अनमोल सहकार्य करणाऱ्या अमळनेर शहर व तालुक्यातील जनतेस समर्पित असल्याचे अध्यक्ष चेतन राजपुत यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!