रावेर बुऱ्हाणपूर टोल नाक्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांची धडक कारवाई..

रावेर ( राहत अहमद ) रावेर तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी व ग्रामस्थ कडून रावेर बुऱ्हाणपूर टोल नाका संबंधित विविध तक्रारी प्राप्त होत होत्या. वारंवार शेतकऱ्यांकडून बळजबरी टोल वसुली करणे, अरेरावी करणे, ट्रॅफिक समस्या

निर्माण करणे तसेच इतर गोष्टीं बाबत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी रावेर-बुऱ्हाणपूर टोल नाक्यावर धडक देत व्यवस्थापनाला जाब विचारण्यात आला तसेच कडक इशारा देत पुन्हा असे गैरप्रकार टोल नाक्यावर होणार नाही यांची हमी व्यवस्थापनाकडून घेण्यात आली.
रावेर तालुक्यातील शेतकरी व स्थानिक नागरिक खूप जास्त त्रस्त होते होता. यांची दखल घेत चंद्रकांत पाटील व अनिल चौधरी यांनी टोल प्रशासनाला कायद्याची जाणीव करूण दिली. टोल मॅनेजर पांडे यांना आदेश दिले तोपर्यंत जिल्हाधिकारी व रावेर तहसीलदार सोबत चर्चा होत नाही तोपर्यंत टोल चालू करायचं नाही अशी समज दिली.
यावेळी वाय .डी .पाटील, संदीप पाटील, उमेश वरणकर, भैय्या पाटील, संजय कोळी, मुजफ्फर भाई, मझहर खान, कुणाल बागरे, शांतीलाल पाटील, हिरादादा पाटील, मुकेश पाटील व समस्त शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .