आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रभाग क्रं 19 जामचा मळा भागात रियाज भाई यांच्या घरापासुन ते नईम भाई यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे या १५ लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह साहेब यांच्या शुभहस्ते….

धुळे (अनिस अहेमद) धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात मुलभूत सुविधा जसे रस्ते,गटारी,पाण्याची पाईप लाईन यासाठी आजपर्यंत लोक प्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता. कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात

नागरीकांचे हाल होत होते. त्या सगळ्या गोष्टींचा आमदार फारुख शाह यांनी अभ्यास करून ज्या भागात रस्ते नाही. गटारी नाही,पाईप लाईन नाही. यासाठी निधी उपलब्ध करून कामाचा सपाटा लावलेला आहे. प्रभाग क्रं 19 जामचा मळा भागात रियाज भाई यांच्या घरा पासुन ते नईम भाई यांच्या घरापर्यंत रस्ता खराब होता. या भागातील नागरिकांनी यासंदर्भात आमदार फारुख शाह यांना निवेदन देवून मागणी केली होती कि, हा रस्ता खराब असून पावसाळ्यात नागरीकांचे फार हाल होत आहे. याची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रभाग क्रं 19 जामचा मळा भागात रियाज भाई यांच्या घरा पासुन ते नईम भाई यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे. या कामासाठी १५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचे आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळेस या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या, वेळी आ.फारुख शाह यांच्यासोबत नगरसेवक आमिर पठाण, प्यारेलाल पिंजारी, इकबाल शाह, आसिफ पोपट शाह, अजहर सैय्यद, माजीद पठाण, शादाब खाटीक, कौसर शाह, हमीद पिंजारी,जहुर शाह, रीयाजूद्दीन शेख,साजिद खान,पप्पू लोहार, सलीम खाटीक, जमीर शेख, निसार पिंजारी, नईम शेख,गुलाब मणियार, रफीक मन्सुरी इ. उपस्थित होते. स्त्याचे काम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आ.फारुख शाह यांचा नागरी सत्कार केला आणि आभार मानले.