राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने इफ्तार पार्टी..

धुळे (प्रतिनिधि) शहरातील चाळीसगाव रोडवरील असलेल्या मुला कॉलनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलिम शेख, शहराध्यक्ष जमीर शेख यांच्यावतीने इम्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इफ्तार पार्टीमध्ये दुवा पठण करून (रोजा) उपवास सोडण्यात आला. याप्रसंगी महेश मिस्तरी, जोसेफ मलबारी, आनंद लोंढे, माजी नगरसेवक अकबर बेग, नगरसेवक अब्दुल लतीफ अन्सारी, वसीम मंत्री, मुक्तार मन्सुरी, शंकर खरात, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे एपीआय धीरज महाजन, युसुफ खाटीक, बॉबी वाघ, प्रकाश वाघ, प्रशांत भदाणे, अझर पठाण, आबीद मणियार, अकबर अली सय्यद यांच्यासह परिसरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीसाठी सलीम शेख, जमीर शेख, सलीम सय्यद, युसुफ मुल्ला, जमील मुल्ला यांनी केले होते.