पंचेचाळीस गावाच्या भीमशक्ती क्रांतिकारी संघटनेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नियोजनाची ची बैठक संपन्न..

0

कल्याण (प्रतिनिधी)
आंबेडकरी विचारधारेवर काम करणाऱ्या मलंगगड परिसरातील 45 गावाच्या भीमशक्ती क्रांतिकारी संघटनेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नियोजनाची बैठक संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली व आरपीआय ए, कामगार आघाडी ठाणे प्रदेश अध्यक्ष मिलिंद वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .
भीमशक्ती क्रांतिकारी संघटना ही संघटना मलंगड परिसरामध्ये आंबेडकरी विचारधारेच्या 45 गावाची संघटना आहे ही संघटना शोषित पीडितांच्या न्याय हक्कासाठी लढणारी व बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करणारी संघटना आहे या संघटनेच्या वतीने 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 45 गावातील रॅलीचे आयोजन ठरवण्यात आले तसेच या आंबेडकर जयंती पासून संघटनेत काम करणाऱ्या युवा भीमसैनिकानावर जयंती साजरी करण्याची जबाबदारी सर्वानुमते देण्यात आली लवकरच युवकांची नवीन कमिटी सुद्धा जाहीर करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली या बैठकीत या 45 गावाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत शोषित पिढ्यांचा हक्कासाठी लढून अनेक पीडीतांना न्याय देणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) कामगार आघाडी ठाणे प्रदेश अध्यक्ष मिलिंद वानखेडे व मलंगगड परिसरातील प्रसिद्ध गायक हरी गोविंद वाघे यांचा सत्कार संघटने च्या वतीने सत्कार सदर बैठकीत करण्यात आला यावेळी संघटनेचे जेष्ठ सल्लागार वसंत जाधव, उपाध्यक्ष गुरुनाथ जाधव ( कोळेगाव), सचिव गुरुनाथ जाधव ( वडवली ),खजिनदार रतन जाधव, युवा भीमसैनिक शुभम जाधव ,महेंद्र गायकवाड ,प्रवीण जाधव ,सागर भोईर ,बौद्धाचार्य प्रदीप जाधव, संजय वंजे, यांच्यासह 45 गावातील संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!