आप’ आता राष्ट्रीय पक्ष.
चार राज्यांमध्ये सहा टक्क्यांहून अधिक मतांची टक्केवारी

24 प्राईम न्यूज 11एप्रिल 2023 दिल्ली ,गोवा, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांतील निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेवर असून आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. याशिवाय शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. यासह, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही काढून घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.