अमळनेरात भाजपातर्फे निघाली सावरकर गौरव यात्रा..

0

अमळनेर (प्रतिनिधि) ” होय मी सावरकर” असा संदेश देत अमळनेर येथे गौरव यात्रा उत्साह पूर्ण वातावरणात काढण्यात आली स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून वारंवार बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याने येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावरकरांच्या सन्मानार्थ सावरकर गौरव यात्रा काढून “होय मी सावरकर”असा संदेश देण्यात आला.
सदर यात्रेदरम्यान सावरकरांच्या कार्याची आणि राष्ट्रभक्तीची माहिती असलेली ध्वनिफीत यावेळी जनतेला ऐकविण्यात आली.भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी आमदार स्मिताताई वाघ आणि माजी आ.डॉ.बी एस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा काढण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते दुचाकीवर विराजमान झाले होते.महाराणा प्रताप चौकातून यात्रेस सुरुवात होऊन मंगलमूर्ती चौक, स्टेशन रोड, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा ,तिरंगा चौक ,बस स्टॅन्ड मार्गे पुन्हा ही यात्रा महाराणा प्रताप चौकात येऊन याठिकाणी समारोप करण्यात आला. तसेच तालुक्यातील मंगरूळ, टाकरखेडा,पातोंडा या ग्रामीण भागात देखील यात्रा रथ नेण्यात आला. या गौरव यात्रेत सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उस्फुर्तपणे सहभागी झाले होते,या यात्रेने शहराचे लक्ष वेधले होते. सदर गौरव यात्रेत शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, रा.स्व.संघाचे स्वयंसेवक, विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!