अखेर अमळनेर च्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास. अतिक्रमण विभगाची कारवाई..

0

अमळनेर (प्रतिनिधी) पालिका व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबवून बालमिया ते सुभाष चौक रस्ता मोकळा करून सिंधी बाजार, आठवडे बाजारातील शेड, बोर्ड हटवण्यात आले.

शहरातील लालबाग, लुल्ला मार्केट, सिंधी बाजार, आठवडे बाजार, कुंटे रोड आदी परिसरात मुख्य बाजार भरत असतो मात्र हातगाड्या, वाढीव शेड ओटे यांचे अतिक्रमण वाढल्याने साधी मोटरसायकल देखील जाणे अशक्य झाले होते. पायी चालणाऱ्या महिला वृद्धांना धक्काबुक्की सहन करावी लागत असे. वाहनांची वाढती संख्या आणि बाजारपेठेतील वाढते व्यवसाय सोबत अतिक्रमण यामुळे सामान्य नागरिकांच्या समस्या वाढल्या होत्या. अखेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आणि पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी संयुक्तपणे कठोर मोहीम राबवण्यासाठी पथक नेमले.
अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, जगदीश बिऱ्हाडे, विशाल सपकाळे, अविनाश बिऱ्हाडे, विकास बिऱ्हाडे, सुरेश चव्हाण, जयदीप गजरे, भूषण चव्हाण, जितेंद्र चावरीया सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोकॉ लक्ष्मीकांत शिंपी, योगेश बागुल, शेखर साळुंखे यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!