राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने अमळनेर तालुका पत्रकार संघाचा साने गुरुजी परिवाराकडून गौरव..

0

अमळनेर ( प्रतिनिधि )

अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघास नुकताच कर्जत येथे आयोजित अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मेळाव्यात परिषदेच्या वतीने पत्रकार संघाच्या सर्वस्पर्शी सामाजिक योगदान व सामान्य जनतेच्या प्रश्नांची सातत्याने बाजू लावून धरल्याबद्दल ‘सामना’ चे संपादक खा. संजय राऊत यांच्या हस्ते व स्वागताध्यक्ष आ. रोहितदादा पवार, मुख्य विश्वस्त एस.एम. देश

मुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक विभागातून आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. याबद्दल तालुका पत्रकार संघावर तालुक्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अमळनेर तालुका पत्रकार संघाला प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अमळनेरच्या साने गुरुजी परिवाराच्या वतीने हेमकांत पाटील, माजी नगरसेवक संदीप घोरपडे यांनी तालुक्यासाठी ही गौरवाची बाब असल्याने पुढाकार घेतला व आज बुधवार रोजी अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीरात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष गो. पि. लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सचिव रोहिदास हाके, ‘सकाळ’ चे प्रतिनिधी प्रा. पी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत अमळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव चंद्रकांत पाटील व कार्यकारिणीचा शानदार सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी रोहिदास हाके, प्रा. पी. एन. पाटील, तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय कृष्णा पाटील, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव दादा पाटील, पत्रकार संघाचे अधक्ष चेतन राजपूत, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. साने गुरुजी परिवाराच्या वतीने विशेषत्वाने पत्रकारांच्या सपत्नीक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. भगिनींसाठी हळदी कुकुंवाचाही कार्यक्रम पार पडला व सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात प्रास्ताविक आयोजक साने गुरुजी शिक्षण मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी केले .यावेळी शहर तालुक्यातून जेष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील , उमेष धनराळे, बाबूलाल पाटील ,गौरवकुमार पाटील ,महेंद्र रामोशी ,आबीद शेख ,डॉक्टर विलास पाटील ,अमोल पाटील ,उमेश काटे , संभाजी देवरे ,श्यामकांत पाटील , समाधान मैराळे ,प्रा हिरालाल पाटील , धनंजय सोनार ,विजय पाटील , किरण पाटील ,हितेंद्र बडगुजर ,अजय भामरे ,अरुण पवार ,डॉ युवराज पाटील ,महेंद्र पाटील , रविंद्र मोरे ,आर जे पाटील ,ईश्वर महाजन ,राहुल पाटील ,मुन्ना शेख ,प्रा जयश्री दाभाडे , नूरखान पठाण ,दिनेश पालवे ,काशिनाथ चौधरी , विक्की जाधव, आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने व साने गुरुजी परिवार उपस्थित होता.सूत्रसंचालन विलास चौधरी यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!