वाघूर प्रकल्पा प्रमाणे पाडळसे धरणाकडे ना. गिरीश भाऊंनी विशेष लक्ष द्यावे. पाडळसे धरण जन आंदोलन समिती…

अमळनेर(प्रतिनिधि )भारतातील एकमेव शासकीय वैद्यकीय संकुल म्हणून जळगाव जिल्ह्यातील मेडिकल हब ला मान्यता मिळणे म्हणजे फार मोठी उपलब्धी आहे. ना. गिरीशजी महाजन यांचे जळगाव जिल्ह्यातील नागरिक व पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.सोबतच अनेक वर्षांपासून रखडलेल्या निम्न्न तापी पाडळसे धरण प्रकल्पाच्या पूर्तीसाठीही लक्ष घालण्याची विनंती समितीतर्फे करण्यात आली आहे.
ना. गिरीशभाऊ आपणास जिल्ह्याचे नेते म्हणून मान्यता आहे. जिल्ह्याच्या कोणत्याही प्रकल्पासाठी विशेष लक्ष देऊन आपण पूर्ण करतात.वाघूर प्रकल्पा प्रमाणे पाडळसे धरणाकडेही आपण विशेष लक्ष द्यावे ही जळगाव जिल्हातील जनतेची अपेक्षा आहेत.आपण दिलेला शब्द पाळतात म्हणून ना.गिरीश भाऊ महाजन यांना निम्न्न तापी प्रकल्पाची आठवण यानिमित्ताने आपले ऐतिहासिक कार्यासाठी अभिनंदन करतांना आम्ही पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्यावतीने हक्काने करून देत आहोत. ना.गिरीश महाजन यांनी सदर धरणाची सुधारित प्रशासकीय मान्यता व इतर बाबी प्राधान्याने पूर्ण करून घ्याव्यात आणि सदर धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजनेत करावा असेही समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी विनंतीपूर्वक कळविले आहे.