राज्यस्तरॉय कुस्ती स्पर्धेत अमळनेरचा निजामअली रौप्य पदक विजेता…

अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात अमळनेरच्या निजामअली सैय्यद याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याला रौप्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. निजामअली सैय्यद याने १

९ वर्षांखालील ९२ किलो वजन गटात चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावतीच्या करण पवार याला १३-० ने पराभूत केले. लातूर च्या सागर यादव व कोल्हापूरच्या ओम शेवाळे याना चित केले तर संभाजीनगर च्या युवराज जाधव याला १० -० ने पराभूत केले. निजाम अली याला हाजी शब्बीर पहेलवान व हसन पहेलवान यांचे मार्गदर्शन लाभले.निजाम आली हा अमळनेर येथील नामवंत पहिलवान हाजी शब्बीर यांचा नातू आहे. निजामअली के डी गायकवाड हायस्कूलचा विद्यार्थी असून त्याच्या उत्तुंग यशाबद्दल चेअरमन अविनाश संदानशीव ,मुख्याध्यापक आनंदराव नेतकर , क्रीडा शिक्षक निलेश विसपुते यांनी अभिनंदन केले आहे.