बालसाहित्यातून चांगली पिढी घडेल- अरुण माळी

एरंडोल( प्रतिनिधी) मुलांना बालसाहित्याची गोडी लागल्यास एक चांगली पिढी निर्माण होईल असा आशावाद निवृत्त तहसीलदार अरुण माळी यांनी व्यक्त केला. ते येथील राष्ट्रीय साहित्य संघाच्या थोर समाजसुधारक महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तने योजिलेल्या काव्यापुषपंजली सप्ताह कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त तलाठी
जगन्नाथ पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक सुरेश देशमुख,रा.ती. काबरे विद्यालयाचे
निवृत्त कर्मचारी तुळशीराम महाजन,देशमुख पंच मंडळाचे नाना देशमुख, भगवान देशमुख, साहेबराव देशमुख, राष्ट्रीय साहित्य संघाचे संयोजक कवी प्रवीण महाजन व्यासपीठावर उपस्थित होते.प्रारंभी महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण माळी यांनी सांगितले की, साहित्य हे समाजाला दिशा देते, त्यातूनच प्रत्येकाला जगण्याची प्रेरणा मिळते. याप्रसंगी जान्हवी महाजन, भुवनेश्वरी देशमुख, कोमल हटकर, निशा हटकर या विद्यार्थिनींनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर भाष्य केले. यावेळी त्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे संयोजक कवी प्रवीण महाजन यांच्या मांजरीचे पिल्लू , मोबाईलचं जग,बेडूक करतो डराव डराव या बालसाहित्याला मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचे साहित्य एक सामाजिक क्रांती घडविणारे असून त्यांचे शिक्षण, सामाजिक कार्य प्रत्येकाला प्रेरित करणारे आहे.या कार्यक्रमास ईश्वरी दत्तू पाटील, प्रणव महाजन, जान्हवी पाटील, ऐश्वर्या महाजन, कृष्णा महाजन, पल्लवी महाजन, नम्रता महाजन, मानसी देशमुख, तनुजा पाटील आदी विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रवीण महाजन यांनी केले.