पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे भारतीय राज्याघटनेचे शिल्पकार ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी यांची जयंती उत्साहात साजरी!

0

जळगाव (प्रतिनिधि ) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,मूकनायक भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी शाळेच्या समन्वयिका सौ. अंकिता मुंदडा यांनी नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. कु.दर्शील कोठारी या विद्यार्थ्याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेच्या परिपाठाच्या वेळी उपरोक्त कार्यक्रम घेण्यात आला.

शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांच्या हस्ते श्री शारदा स्तवन ,दीपप्रज्वलन तसेच मूकनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या . डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते..त्यांच्या सेवेचा वारसा देशवासीयांसाठी आजही तितकाच आदर्श,मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहे असे ते यावेळी म्हणाले. अवांतर वाचनासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. पुस्तक मस्तकाला सशक्त बनविते असे मस्तक अन्यायापुढे कधीच नतमस्तक होत नाही हा संदेश विद्यार्थ्यांना दिला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे विद्यार्थी व शिक्षकांनी आपले विचार मांडले.

कु.अश्लेषा लोखंडे या विद्यार्थिनीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजकार्याविशायीचे विचार आपल्या भाषणातून मांडले.कु.देवांश चौधरी या विद्यार्थ्याने डॉ.बाबासाहेब यांच्या बाल जीवनावर आधारित प्रसंगांचे वर्णन केले.तर कु.हर्षा सोनवणे व कु.पलक राजपूत या विद्यार्थ्यानिनी बाबासाहेबांचे जीवनकार्य कवितेच्या माध्यमातून उपस्थितासमोर सादर केले. कु.अनंत बरी याने बाबासाहेबांचे प्रगल्भ विचार तसेच समाज सुधारणे साठी दिलेले महत्वपूर्ण योगदान ,अस्पृश्यता निवारण ,शिक्षणासाठी प्रेरणा ई.विषयी माहिती दिली.तर कु. प्रणव पाटील याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांविषयी माहिती दिली..यावेळी डॉ.बाबास्हेब आंबेडकर यांनी समाजाला केलेले उपदेश विविध घोषणातून उपस्थितांसमोर व्यक्त केले.

शिक्षिका गीता पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण क्षेत्रातील पदव्या व विविध सन्मानांचा उल्लेख केला.६४ विषयातील त्यांचा गाढ अभ्यास व ११ भाषा अस्खलितपणे बोलणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित , कायदेतज्ञ ,घटनाकार,अर्थशास्त्रज्ञ,राजकारणी,तत्वज्ञ व थोर समाजसुधारक होते अशी माहिती उपस्थितांना दिली.

अयोजीत कार्यक्रमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती मिळाली.शिक्षणातून समाजसुधारणा कशी घडविता येते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला.

पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ, प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे, वरिष्ठसमन्वयक हिरालाल गोराणे , शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवली होती.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!