पुन्हा एकदा तुटपुंजा पगारात देखील इमानदारीचे घडविले दर्शन….

धुळे ( अनिस अहेमद) धुळे आगारातील वाहक श्री ई.एन.शेख हे सुरत कर्तव्यावर असताना त्यांच्या गाडीत एका प्रवाशाचा मोबाईल बस मध्ये राहून गेला प्रवासी उतरून गेल्यावर श्री शेख यांनी गाडी चेक केले असता त्यांना मोबाईल मिळून आला तो मोबाईल कोणाचा आहे ही खात्री होत नव्हती काही वेळानंतर त्या मोबाईलवर कॉल येत होते त्यांनी कॉल रिसिव्ह करून त्या प्रवाशांना मोबाईल माझ्याकडे आहे काळजी करू नका तुम्हाला तुमचा मोबाईल व्यवस्थित भेटेल अशी हमी दिली व त्यांनी धुळे आगारात येऊन आगार व्यवस्थापक श्री पंकज देवरे सर यांच्याकडे सुपूर्त केला व काल त्या प्रवाशांचे मित्र पोलीस कॉन्स्टेबल यांना साहेबांच्या समवेत तो मोबाईल सुपूर्द केला यावेळी आपल्या आगारातील श्री आर के आबा. संजू भाऊ परदेशी यांनी वाहक श्री शेख यांचे आभार व्यक्त केले…