भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. बाईक रॅली ने वेधले अमळनेरकरांचे लक्ष…

कसाली मोहल्यात बाईक रॅली वर मुस्लीम बांधवांकडून पुष्पुरुष्ठी
अमळनेर( प्रतिनिधि) अमळनेर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने डॉ आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी काल जनसागर लोटला होता.
पुतळ्या भोवती सुंदर सजा

वट केली असल्याने हा संपूर्ण परिसर अत्यंत खुलुन दिसत होता,याठिकाणी फोटो काढणाऱ्यांची रिघच लागली होती,काल दि 14 एप्रिल रो
जी सकाळी आमदार अनिल भाईदास पाटील व शासकीय अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले,यावेळी बुद्ध वंदना सादर केल्यानंतर सर्वांनी अभिवादन केले.यावेळी आमदारांसह मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक विजय शिंदे,नरसिंग वाघ,डॉ आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र संदानशिव,प्रा सुभाष पाटील,सौ सुलोचना वाघ,न प चे संजय चौधरी,अँड तिलोत्तमा पाटील, मुन्ना शर्मा, सोमचंद संदानशिव,मुख्याध्यापक आनंदराव नेतकर,सिद्धार्थ सोनवणे,ऍड एस एस ब्रह्मे,विनोद कदम,मनोज पाटील,धनगर दला पाटील यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

बाईक रॅलीने वेधले लक्ष त्यानंतर सामाजिक परिषदेतर्फे बसकाळी 10 वाजता डॉ.आंबेडकर चौकातून भव्य मोटार सायकल रॅली लढण्यात आली.सदर रॅली अण्णासाहेब रामभाऊ संदानशिव मार्गे पैलाड,वाडी चौक, माळीवाडा, झामीचौक,तिरंगा चौक,,बस स्टॅण्ड,कॉटन मार्केट,पिंपळे रोड,कलागुरु,छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर,स्टेशन रोड,सुभाष चौक नंतर पुन्हा डॉ आंबेडकर चौकात विसर्जन करण्यात आले,नरेंद्र संदानशिव यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली.
रॅली कसाली मोहल्यात आल्यावर मुस्लीम बांधववानी पुष्पवृष्टी करून स्वागत केले .
सायंकाळी अनेक ठिकाणी निघाल्या मिरवणुका डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात विवीध ठिकाणी पूजन आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,डॉ आंबेडकर चौक,फरशी रोड,प्रबुद्ध कॉलनी आदी भागातून सायंकाळी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या, प्रचंड जल्लोष भीमसैनिकांनी केला,यावेळी अनेक ठिकाणी बाहेर गावचे आकर्षक डी जे मागविण्यात आले असल्याने तरुणाई साठी ते आकर्षन ठरले,पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात सर्व मिरवणुका शांततेत पार पडल्या.