एरंडोल येथे १३२ वी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

0


एरंडोल (प्रतिनिधि) येथे विविध ठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ९:३० वाजता पंचशील ध्वजारोहण तहसिलदार सुचिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले व सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.त्यानंतर मावळते प्रांताधिकारी विनय गोसावी व नवनियुक्त प्रांताधिकारी मनिष कुमार गायकवाड,तहसिलदार सुचिता चव्हाण,पोलीस निरीक्षक सतिष गोराडे, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल,सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे,मुख्याधिकारी विकास नवाळे,तालुका पुरवठा अधिकारी संदिप निळे,महाराष्ट्र राज्य जनजाती क्षेत्र प्रमुख ॲड.किशोर काळकर,माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,देविदास महाजन,रविंद्र महाजन,राजेंद्र चौधरी,शिवसेना उबाठा जेष्ठ नेते रमेश महाजन,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,राजेंद्र शिंदे,माजी नगरसेवक डॉ.सुरेश पाटील,माजी उपनराध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम,रविंद्र पाटील,अतुल महाजन,कृणाल महाजन,प्रशांत महाजन,उषाकिरण खैरनार,ईश्वर बिऱ्हाडे,रविंद्र जाधव,मोहन शिंदे,गुलाब चौधरी,आनंदा चौधरी,चिंतामण पाटील,सुनील खोकरे, मयुर महाजन,निवृत्त तहसिलदार अरुण माळी,राहुल तिवारी,पी.जी.चौधरी,प्रा.के.जे.वाघ,डॉ.के.ए.बोहरी, आदी मान्यवरांच्या हस्ते तथा विविध सामाजिक,राजकीय व शैक्षणिक संस्थांतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर भीमसैनिक युवकांनी शहरात मोटार सायकल रॅली काढली.प्रत्येक मोटार सायकलला आकर्षक निळे झेंडे लावण्यात आले होते तसेच याप्रसंगी विविध घोषणांनी परिसर दुमदुमला होता.संध्याकाळी आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड,राजेंद्र चौधरी,चिंतामण पाटील,अमोल तांबोळी,रविंद्र जाधव,बबलु पाटील, समस्त समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासुन सुरुवात करण्यात आली. संपुर्ण शहरात मिरवणुक फिरुन सांगता पुतळ्यावर करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष सुनील सैंदाणे , ईश्वर बिऱ्हाडे, धनंजय खैरनार,अतुल सोनवणे, कैलास गायकवाड, भैय्या आहीरे, मोहन सैदाणे, संघरत्न गायकवाड,आकाश आहीरे,प्रसन्नजित सोनवणे,प्रेमराज गायकवाड,छोटु बेहरे, नितिन बोरसे,सागर बोरसे,लखन बनसोडे, नरेंद्र सैंदाणे, पंकज बेहरे , विजय गव्हाणे, विजय गायकवाड, राहुल पवार आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!