एरंडोल उपविभागीय अधिकारी मनिष गायकवाड यांनी स्वीकारला पदभार.

एरंडोल ( प्रतिनिधी ) एरंडोल येथील नवनियुक्त प्रांताधिकारी मनिष कुमार गायकवाड यांनी १३ एप्रिल २०२३ रोजी कार्यालयीन वेळेत पदभार स्वीकारला.याप्रसंगी मावळते प्रांताधिकारी विनय गोसावी व कार्यालयीन अधिकारी तथा कर्मचारी हजर होते.
मनिष कुमार गायकवाड हे या आधी अमरावती येथे भूसंपादन अधिकारी पदावर कार्यरत होते.नूतन प्रांताधिकारी यांच्या कार्यकाळात पंचायत समिती, लोकसभा,विधानसभा,न.पा.निवडणूक यशस्वीपणे पार पडतील व ही जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे तसेच नैसर्गिक आपत्ती,नुकसान,पंचनामे,कायदा सुव्यवस्था आदी सर्व गोष्टींवर माझा कटाक्ष राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.