ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे अध्यक्ष तथा इस्लामी स्कॉलर मौलाना राबे हसनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

0

जळगाव (प्रतिनिधि) ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्ड चे अध्यक्ष हजरत मौलाना राबे हसनी नदवी यांचे गुरुवारी १३ एप्रिल रोजी लखनऊ येथील दलिगंज मधील नदवा मदरसा मध्ये वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळा च्या आजाराने निधन झाले.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व त्यांना अल्लाह स्वर्गात जागा देवो यासाठी जळगा

व जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीतर्फे शुक्रवारी नमाज नंतर विशेष सभेचे व दुवा (प्रार्थने)चे आयोजन करण्यात आले होते यावेळी मौलानाला उपस्थित सर्व राजकीय, सामाजिक, बिरादरी व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी श्रद्धांजली त्यांना स्वर्गप्राप्तीसाठी दुवा करण्यात आली. मौलाना राबे हसनी यांचा थोडक्यात परिचय

या शोकसभेत मनीयार बीरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी उपस्थितांना मौलानांचा अल्प परिचय करून देताना नमूद केले की त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९२३ ला रायबरेली येथे सर्वसामान्य कुटुंबात झाला आपले शिक्षण पूर्ण करताच त्यांना दारूल ऊलूम देवबंद या इस्लामी संस्थेत वयाच्या २२ व्या वर्षी असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्ती करण्यात आली व तीनच वर्षात म्हणजे वयाच्या २५ व्या वर्षी ते अरेबिक भाषेचे विभाग प्रमुख झाले.
दारुल उलूम नदवाचे ते १९९३ कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली तर २००० साली ते दारुल उलूम नदवाचे ते कुलपती झाले.

त्यांनी तीस पुस्तके लिहून प्रकाशित केली असून ती पुस्तके आजही संपूर्ण जगातील इस्लामिक विद्यापीठात शिकवली जातात त्याचप्रमाणे अरबी मदरसा या मध्ये सुद्धा शिकवली जात आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेत भारत सरकारने सुद्धा त्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविले होते.

ते मुस्लिम वर्ड लीग आलमी राबता इस्लामी या सौदी अरेबियातील संस्थेचे संस्थापक सदस्य होते.
त्यांनी लखनऊ येथे इंटरग्रेल विद्यापीठाची स्थापना केली असून त्या विद्यापीठाच्या माध्यमातून आयएस व आयपीएस अधिकारी म्हणून बाहेर पडत आहे.

विश्व जगातील प्रथम ५० महनीय मुस्लिम व्यक्तिमत्व मध्ये त्यांची गणना होत असे.
मौलाना राबे हसनी हे विश्व जगात नावाजलेले इस्लामिक स्कॉलर मौलाना अली मिया नदवी यांचे भाचे होते व त्यांचे उत्तराधिकारी म्हणून म्हणूनच त्यांनी कार्यभार सांभाळलेला होता व त्यामुळेच त्यांची कारकिर्दी ही लखनऊ मध्येच स्थाई झालेली होती.
अशा या थोर इस्लामिक स्कॉलर कुलगुरू व मुस्लिम पर्सनला बोर्ड चे सर्वात जास्त वर्ष अध्यक्षपद सांभाळणारे मौलाना राबे हसनी नदवी यांच्या मृत्यूमुळे भारतातील नव्हे तर जगातील मुस्लिम समाजाची फार मोठी हानी झाली असून त्यांच्या निधनाने फार मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे मत फारुक शेख यांनी व्यक्त केले.

यांनी वाहली श्रद्धांजली
प्रख्यात उर्दू ज्येष्ठ पत्रकार अली अंजुम रीझवी, सईद पटेल, अकील ब्यावली, मणियार बिरादरी चे फारुक शेख, अझीझ शेख, असलम शेख,हकीम चौधरी, कूल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद व डॉक्टर जावेद शेख, वहिदत ए इस्लामी चे अतिक शेख, एम पी जे चे आरिफ देशमुख व महैमद शेख, जमाते इस्लामीचे सोहेल शेख व मुस्ताक शेख, सत्य प्रचार चे मुस्तफा शेख व हाजी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मजहर खान व सलीम इनामदार, काँग्रेस आय चे नदीम काझी व बाबा देशमुख , शिवसेना ठाकरे गटाचे झाकीर पठाण व मतीन सय्यद, समाजवादी पार्टीचे रईस बागवान ,एम आय एम चे अहमद सर,नगरसेवक रियाज बागवान,अक्रम देशमुख व हाजी युसुफ,अक्साबॉईज चे एडवोकेट आमिर शेख व शाहिद शेख,शिकलगर बिरादरीचे अन्वर खान, मुजाहिद खान व अजिज शिकलगर,काकर बिरादरीचे रफिक काकर,शहा बिरादरीचे आसिफ शाह व अजमल शाह,मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे ताहेर शेख व अनिस शाह,हुसेनी सेना चे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, तांबापुर चे मतीन पटेल व वहीद बापू,ऊस्मानियाचे समीर शेख.नाजिम व झाकीर पेंटर आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!