गुन्हेगारी विश्वातून राजकारणातून आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून केली हत्या.

24 प्राईम न्यूज 16 एप्रिल गुन्हेगारी विश्वातून राजकारणातून आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात नेताना पोलिसांच्या ताब्यात असताना हा हल्ला झाला. याप्रकरणी पोलिसांनी

तीन हल्लेखोरांना अटक केली आहे. अतिकवर विविध प्रकारचे सुमारे 100 गुन्हे दाखल होते. उमेश पाल हत्याप्रकरणातील आर असलेला अतिकचा मुलगा असाद आणि असादचा साथीदार गुलाम हे गुरुवारी झाशी इथलं पोलीस चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर शनिवारी अतिक आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांना उमेल पाल हत्येप्रकरणात पोलीस वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराजला घेऊन आले होते. त्यावेळी हल्ला झालादरम्यान, या असद प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा न्यायदंडाधिकारी अंकुर श्रीवास्तव यांना तपास अधिकारी बनवण्यात आले आहे. आदेशात म्हटले आहे की, कुणीही व्यक्ती एन्काऊंटरविषयीचे पुरावे 3 दिवसांत देऊ शकतो. असदच्या नातेवाईकांनी यापूर्वीच अतीकची एन्काउंटर करून हत्या होणार असल्याची भीती वर्तवली होती मात्र आता तसे घडले नाही. आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आल्यानंतर हल्लेखोरांनी अचानक येत गोळ्या झाडल्याने अतीकसह त्याच्या भाऊ अश्रफ अहमदचा मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, हल्लेखोर तीन होते व त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. नवीन तिवारी, अरुण मोरया व सोनू अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुंड अतीक अहमद हा २००५ मधील बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी होता. तसेच अतीक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये खून, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. दुचाकीवरून तीन संशयित पत्रकारांच्या वेशात आले व त्यांनी प्रतीक अहमद मीडियाला बाईट देत असताना त्याच्यासह भाऊ अश्रफ अहमदच्या डोक्यावर गोळ्या झाडल्या. दरम्यान हत्यानंतर आरोपींनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या तसेच सरेंडर सरेंडर म्हणत पोलिसांकडे आत्मसमर्पण केले.