सोयगाव-जरंडी रस्त्यावर पिक-अप दुचाकींचा अपघात; दोन गंभीर-जरंडी जवळील घटना..

.
जरंडी,(साईदास पवार) दि.१९…शेतातून घराकडे जाणाऱ्या स्कुटीला नेवपूर(ब्राम्हणी) ता कन्नड कडून भरधाव वेगात जाणाऱ्या मजुरांच्या पीक-अप(महिंद्रा) वाहनाने सोयगाव-जरंडी रस्त्यावर जरंडी गावाजवळ उडविले बुधवारी दुपारी दोन ते अडीच

वांजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे यामध्ये शेतकरी व भरधाव मजुरांच्या वाहनातील १४ वर्षीय मुलगी असे दोन गंभीर जखमी झाले आहे या अपघाताची सोयगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे दरम्यान अपघात स्थळावरून महिंद्रा पीक अप चा चालक फरारी झाला आहे
नेवपूर(ब्राम्हणी) ता कन्नड कडून भरधाव वेगात जाणाऱ्या महिंद्रा पीक अप मजूर घेवून खंडवा (मध्य प्रदेश) जात असतांना सोयगाव-जरंडी रस्त्या दरम्यान जरंडी गावाजवळ हा अपघात झाला आहे शेतातून स्कुटी क्र-एम-एच-२० डी, यु-९२१९ शेतकरी गौतम नामदेव सावळे(वय५८) हे शेतातून घराकडे पत्नी सह जात असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास समोरून आलेल्या महिंद्रा पीक अप क्र-एम-एच २० डी-ई ७२१७ या वाहनाने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने स्कुटी चालक गौतम साळवे (वय५८) यांच्या मेंदूला पायांना फ्रॅक्चर होवून हाताला फ्रॅक्चर झाले आहे तर त्यांची पत्नी शोभा बाई गौतम साळवे या स्कुटी वरून दूरवर फेकल्या गेल्या महिंद्रा पीक अप मधील मजुरांची संध्या नारायण झावरे (वय१४) ,ही गंभीर जखमी झाली आहे.अपघातातील गंभीर गौतम साळवे यांचे वर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले तर संध्या झावरे हिच्यावर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे अपघात स्थळी शेता जवळील सोमा कोळी,सागर सोनवणे, दीपक जगताप, गजानन कोळी अजय सोनवणे अनिल कोळी गजानन बोरसे आदींनी जखमींना तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यासाठी मदत कार्य केले दरम्यान घटनास्थळी सोयगाव पोलीस ठाण्याचे अजय कोळी,ज्ञानेश्वर नरोडे आदींनी पंचनामा केला आहे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू बर्डे अजय कोळी ज्ञानेश्वर नरोडे आदी पुढील तपास करत आहे
—–घटनास्थळवरून फरारी चालक सोयगाव पोलीस ठाण्यात स्वतःहून जमा झाला असल्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी सांगितले सायंकाळी उशिरापर्यंत सोयगाव पोलीस ठाण्यात चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती….