बनावट चावी द्वारे चारचाकी वाहणांची चोरी करणारे अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखा व चाळीसगाव रोड पोलिसाकडून जेरबंद..

धुळे ( अनिस अहमद ) धुळे येथील देविदास त्र्यंबक अहिरराव वय 67 रा. साईबाबा मंदिराजवळ पश्चिम
हुडको, धुळे यांनी त्यांचे मालकीची पांढर्या रंगाची टाटा DI २०७ RX पिकअप चारचाकी वाहन क्र. MH-2-AN- २२०९ हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी चोरी केल्याबाबतची तक्रार दिली होती. चोरी गेलेला वाहणाचा शोध घेणेबाबत मा. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पोलीस निरीक्षक
श्री. हेमंत पाटील स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना सुचना देऊन गुन्ह्याची उकल करणेबाबत आदेशीत केले होते. सदर आदेशानुसार माहिती प्राप्त करीत असतांना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की. सदरचा गुन्हा चाळीसगाव रोड परिसरातील अरबाज मनियार व त्याचा साथीदार शाहरुख
खाटीक यांनी केला असल्याचे माहीती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेशित केले. पोलीस पथक संशयीत आरोपी अरबाज शेख व शाहरुख खाटीक यांचा शोध घेत असतांना ते चाळीसगाव रोड चौफुली येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारता १) अरबाज शेख साजीद मनियार वय २५ वर्षे २) शाहरुख अब्बास खाटीक वय २६ वर्ष दोन्ही रा. जामचा मळा, चाळीसगाव रोड, धुळे असे सांगितले,
आरोपीतांना गुन्ह्यातील चोरी केलेल्या बाणांबाबत सखोल विचारपुस करता त्यांनी दीन चारचाकी वाहने बनावट चावी द्वारे चोरी केल्याचे सांगितले. चाळीसगाव रोड परीसरातून चोरी केलेले पिकअप वाहन MH-१८ AA २२०९ हे ज्योती टॉकीज जवळ लपविले असल्याचे सांगितले व बुलढाणा जिल्ह्यातून चोरी केलेले क्रुझर वाहन क्र.MH-२८-४-६२४५ हे संत नरहरी नगर येथे लपविले असल्याचे सांगितले. स्थागुशा पथक व चाळीसगाव रोड पोलीस ठाणे चे पथकाने लागलीच दोन्ही वाहणाने ताब्यात घेतली नमुद दोन्ही आरोपीतांकन खालील दोन गुन्ह्याची उकल झाली आहे.
नमुद दोन्ही आरोपीतांकडुन दोन गुन्हयांची उकल होवुन ४,५०,०००/- रु. कि.चा जप्त करण्यात आला असून अधिकचा तपास चाळीसगाव रोड पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई श्री.संजय बारकुड, पोलीस अधीक्षक, धुळे, श्री. किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे. श्री. एस.ऋषीकेष रेडी सहा.पोलीस अधीक्षक, धुळे शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.अ.शा.चेपो.नि. श्री. हेमंत पाटील, पो.नि. धिरज महाजन चाळीसगाव रोड पो.स्टे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/बाळासाहेब सुर्यवंशी, पोहेकॉ / संदिप सरग, पोना/पंकज खैरमोडे, पोशि/महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील व चाळीसगाव रोड पो.स्टे.चे पोहेकॉ/पंकज चव्हाण, संदिप पाटील, पोना/प्रदिप पाटील, अविनाश पाटील, पोशि/ इंद्रजीत वैराट, स्वप्निल सोनवणे, शरद जाधव, चेतन झोळेकर व हेमंत पवार अशांनी केली आहे.