धार येथे मंगळवारी कोणतीही बस थांबली नाही विद्यार्थनचे हाल. विद्यार्थ्यांनी दिले निवेदन..

अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर तालुक्यातील धार येथे दिनांक १८ एप्रिल मंगळवारी सकाळपासून एसटी बस धार येथे थांबली नाही अशी तक्रार विद्यार्थिनींची होती म्हणून सगळे विद्यार्थी यांनी धार गावाचे माजी उप सरपंच विद्यमान अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांकांचे विभागाचे अध्यक्ष अलीम मुजावर यांच्याकडे व्यथा मांडली व विद्यार्थिनी सोबत एसटी डेपोचे व्हॉइस मॅनेजर चौधरी साहेब यांना गाड्या थांबत नाही असा निवेदन अलीम मुजावर व सगळे विद्यार्थ्यांनी दिले यापुढे असे होणार नाही असे आश्वासन एस टी महामंडळाचे अधिकार यांच्या वतीने देण्यात आले