महाराष्ट्र दिनी १ मे रोजी रथोतस्व सखाराम महाराजांच्या यात्रेची तयारी सुरू… यात्रेत जातीय सलोख्याचे दर्शन घडते…

अमळनेर ( प्रतिनिधि ) सखाराम महाराजाच्या यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली असून यात्रेचा २२ एप्रिल अक्षय्य तृतीयेला स्तंभरोपण व ध्वजारोहण करून शुभारंभ करण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्र दिनी १ मे रोजी रथोत्सव आणि ५ मी रोजी पालखी मिरवणूक होणार आहे. २२ रोजी स्तंभरोपण व ध्वजारोहण झाल्यावर २२ ते २९ एप्रिल तुकाराम महाराज गाथा भजन होणार आहे. ३० रोजी गाथा भजन सांगता आणि सकाळी साडे सात वाजता हभप मोहन महाराज बेलापूरकर यांचे व दिंडीचे

आगमन होईल. १ रोजी वैशाख मोहिनी एकादशीला सायंकाळी साडे सात वाजता रथोत्सव होणार आहे. तर ५ रोजी सकाळी वैशाख पौर्णिमेला पालखी मिरवणूक, ६ रोजी मोहन महाराज बेलापूरकर यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता होईल. या दरम्यान संत सखाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबीर, विविध महाराजांचे, बाहेरगावाहून आलेल्या मंडळाचे भजन, कीर्तन, भारुड कथ्थक नृत्य, पारंपरिक कार्यक्रम होतील. त्यांनंतरही सुमारे २० दिवस यात्रोत्सव सुरू असतो. या यात्रोत्सवात रथ आणि पालखी मिरवणुकीत सर्वजाती धर्मीय लोकांचा सहभाग आणि प्रशासन सह सर्वच स्तरातील लोकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग असतो . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संत सखाराम महाराजांचे वारसदार हभप प्रसाद महाराज यांचे भक्त यात्रेसाठी आलेले असतात. रथ मिरवणुकीतमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संत सखाराम महाराजांचे वारसदार हभप प्रसाद महाराज यांचे भक्त यात्रेसाठी आलेले असतात. रथ मिरवणुकीत बागलाण येथील आदिवासी सांस्कृतिक कला मंडळ आणि सुरेश अहिरे यांचे मंडळ तर पालखी मिरवणुकीत सिद्धेश्वर महादेव शिवतांडव ढोल वादन पथक नाशिक व भुसावळ बँड पथक यांचे आकर्षण आहे.