वेध रमजान ईद चे … तयारी ईदगाह व कब्रस्तान ट्रस्ट ची..

जळगाव ( प्रतिनिधि ) २२ मार्च रोजी साजरी होणाऱ्या रमजान ईद ची तयारी इद गाह तर्फे अध्यक्ष वहाब मलिक यांच्या नेतृत्वात जनरल सेक्रेटरी फारुक शेख सह सचिव अनिस शाह व सर्व विश्वस्त मार्फत सुरू करण्यात आले असून आता पावेतो संपूर्ण

इद गाह मैदान व कब्रस्तान मधील साफसफाई करण्यात आली. सालार नगर कडून बाबे हजरत उस्मान या गेट मधून येणाऱ्या साठी नवीनच १३ नळांचे वजूखाना तयार करण्यात आला आहे तर या पूर्वीच बावे अबूबक्र सिद्दिक या गेटवर २५ नळाचे वजूखाना सह जुन्या मुख्य द्वार असलेल्या हजरत अली गेटवर ६० नळांचा वजूखाना नमाजी साठी तयार झालेला आहे.
मनपा तर्फे 3 हाय मस्ट लॅम्प
जळगाव शहर महानगरपालिकेने सुद्धा नगरसेवक रियाज बागवान यांच्या सहकार्याने इदगाह मैदानावर तीन हाय मस्ट लॅम्प लावून दिले असून पूर्वी आमदार भोळे यांच्या निधीतून एक हाय मस्ट लॅम्प लावण्यात आलेले आहे.
मलिक परिवारातर्फे अत्याधुनिक पाणपोई
मलिक परिवाराने सुद्धा आपल्या स्व खर्चाने स्वर्गवासी हाजी गफ्फार मलिक यांच्या नावाने अत्याधुनिक नाविन्यपूर्ण अशी थंड पाण्याची पाणपोई सुरू केली असून ती सुद्धा मौलाना उस्मान यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेली आहे.