सोयगाव पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी—हिंदू मुस्लिम एकात्मता…

घोसला (अमोल बोरसे) हिंदू-मुस्लिम एकात्मतेची दर्शन घडविण्यासाठी सोयगाव पोलिसांनी पुढाकार घेत रमजान च्या पवित्र महिन्यात मंगळवारी रात्री सोयगाव पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टीच्या निमित्ताने एकत्र येत एकात्मतेची दर्शन घडविले यावेळी सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी पुढाकार घेत पोलिसांचा सहभाग नोंदवला दरम्यान हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडवीत मंगळवारी रोजा सोडला
यावेळी पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांचेसह पोलिसांनी जनतेच्या मांडीला मांडी लावून रमजान चा उपवास सोडविला आहे यातून जिल्हाभर एकात्मतेचा संदेश देण्याचं प्रयत्न पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले असल्याचं पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी सांगितले यावेळी शेख बबलू किशोर मापारी कदीर शहा हर्षल काळे ,अली शेख,समाधान काळे संतोष बोडखे योगेश बोखारे,सुनिल काळे, संतोष घनगाव पोलीस कर्मचारी नारायण खोडे, अजय कोळी संजय शहापूरकर गणेश रोकडे संदीप सुसर सादिक तडवी श्रीकांत घागरे, संभाजी भोजने
घागरे आदींची उपस्थिती होती….