दिपक उखर्डु वाल्हे यांना धोबी परिट समाजातील मानाचा समजला जाणारा ” राष्ट्रीय समाजभुषण ” पुरस्काराने सन्मानित…

0

अमळनेर (प्रतिनिधि) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संंस्थापक अध्यक्ष लाँन्डी व्यावसायिक दिपक उखर्डु वाल्हे हे गेल्या 19 – 20 वर्षांपासून करित असलेल्या सामाजिक कार्य व त्यांनी राबविलेले विविध क्षेत्रातील उपक्रम व कोरोना काळातील उपक्रमांची दखल घेऊन अखिल भारतीय धोबी महासंघाच्या ( ABDM ) वतीने दिला

जाणारा यंदाचा धोबी समाजातील मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार 2023 या पुरस्कार अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया यांच्या शुभहस्ते भाईंदर येथे प्रदान करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अशिषजी कदम धोबी समाज आरक्षण प्रमुख एकनाथरावजी बोरसे सर वरिष्ठ उपाध्यक्ष रमाकांतजी आहेर उद्योगपती प्रा डॉ रंजनी लुगसे
प्रा डॉ सदाशिव ठाकरे सुरेश ठाकरे राजेंद्र सोनवणे भास्कर महाले आदी उपस्थित होते
आतापर्यंत दिपक वाल्हे यांना राष्ट्रीय राज्यस्तरीय विभागीय जिल्हास्तरीय पुरस्कार तसेच कोरोना काळात केलेल्या विविध उपक्रमाबद्दल कोरोना योद्धा पुरस्कार असे आतापर्यंत 46 पुरस्कार प्राप्त झाले आहे
दिपक वाल्हेनी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की
आजपर्यंत आपण सर्वांनी केलेल्या सहकार्यानेच शक्य झाले. अखिल भारतीय धोबी महासंघ ( ABDM ) व आपल्या सर्वाचाच आभारी आहे. पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढते अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते अर्थात काम करताना अनेक अडचणी येतात पण पुन्हा अशा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने नव्याने काम करण्याच्या उत्साह निर्माण होतो पुरस्काराने मला प्रेरणा मिळेल व भविष्यात देखील नवनवीन उपक्रम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!