धार गावात इफ्तार पार्टीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकात्मतेच्या संदेशाला २७ वर्ष पूर्ण..

अमळनेर (प्रतिनिधि) तालुक्यातील धार येथे सन १९९४ पासून आज ते आजपर्यंत सन २०२३ असे एकूण २७ वर्षापासून धार गावांचे माननीय बापू सो सुरेश सजन पाटील हे मुस्लिम समाजाला इफ्तार पार्टीच्या आयोजन रमजान महिन्यातील २७ व्या रोजाला दरवर्षी करतात हिंदू मुस्लिम एकता चे या कार्यास आज २७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी २७ व्या रोजाला संपूर्ण मुस्लिम समाजाला इफ्तार पार्टी व जेवणाच्या कार्यक्रम ठेवलं होतं त्या ठिकाणी १९९४ पासून ते आज पावतो सुरेश बापूंनी इफ्तार पार्टीला खंड पडू दिला नाही त्यांनी दोन वर्ष लॉक डाऊन मध्ये सुद्धा इस्तार पार्टीच्या आयोजन केलं होतं त्याबद्दल त्यांच्या आज मुस्लिम समाजातर्फे त्यांचे चिरंजीव वि.का. सोसायटीचे सदस्य मिलिंद सुरेश पाटील यांच्या जंगी सत्कार करण्यात आला मुस्लिम समाजातर्फे त्यांच्यासोबत त्यांचे चुलत बंधू धार गावाचे माजी सरपंच यशवंत शंकर पाटील व अरुण भाईदास पाटील व मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमळनेर तालुका शेतकी संघाचे माजी प्रशासक सदस्य अलीम मुजावर यांनी केले व आभार विकास सोसायटीचे माजी चेअरमन व्ही एन मुजावर यांनी केले