जरंडी परिसरला वादळचा फटका;निंबायती गावात घरावर झाड कोसळले; सोयगाव बनोटी रस्त्यावर झाडे आडवी..

जरंडी (साईदास पवार) जरंडी सह परिसराला गुरुवारी दुपारी चार वाजता वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटत अवकाळीच्या पावसाने तडाखा दिला असून वादळी वाऱ्याचा मोठा फटका होता दरम्यान निंबायती गावात एका घरावर झाड कोसळले आहे तर

घोसला भागात रस्त्यावर वादळी वाऱ्याने झाडे कोसळले आहे दरम्यान रस्त्यावर झाडे कोसळल्या मुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती
जरंडी परिसराला वादळाचा मोठा फटका बसला आहे निंबायती,बहुलखेडा,कवली,निमखेडी, उमर विहिरे, घोसला जरंडी या गावांना मोठ्या प्रमाणावर वादळ होते घोसला गावावर वादळाचे मोठे संकट कोसळले होते दरम्यान या भागात विजांचा कडकडाट सह अवकाळीच्या पावसाने पंधरा मिनिटे हजेरी लावली दरम्यान निंबायती गावात वादळाच्या तडाख्यात जितेंद्र विठ्ठल वाघ यांच्या राहत्या घरावर झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे.घरावर झाड कोसळताच घरातील सदस्यांनी घर सोडले होते…याप्रकरणी महसूल ने घटनेचा पंचनामा केला आहे….
—-शेती पिकांची नुकसान झाले असून वादळी वाऱ्यात कापाणी वर आलेल्या ज्वारी बाजरी आडव्या झाल्या आहे त्यामुळे या महिन्यात रब्बी च्या पिकांना दुसऱ्यांदा नुकसानीचा फटका बसला आहे…..