एरंडोल न्यायालयातर्फे कायदेविषयक शिबीर व फिरते लोकअदालतीचे आयोजन.

0


एरंडोल ( प्रतिनिधी ) एरंडोल येथील तालुका विधी सेवा समिती, एरंडोल आणि तालुका वकील संघ, एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी रिंगणगाव, ता. एरंडोल येथे “Right of Children to Free and Compulsory Education Act” आणि “P.C.P.N.D.T Act” आणि “Prohibition of Child Marriage Act” या विषयांवर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी रिंगणगाव,ता.एरंडोल येथे अॅड.आकाश महाजन, अॅड. जयेश पिलोरे यांनी उपरोक्त विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. ए. तळेकर,अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती,एरंडोल यांनी देखील उपस्थितांना सदर विषयांवर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन नितीन बेडिस्कर यांनी केले.
त्यानंतर एरंडोल तालुका विधी सेवा समितीतर्फे फिरते लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. सदर फिरते लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण १८ प्रकरणे निकाली निघाले. सदर फिरते लोकअदालतीस एरंडोल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश बी.ए.तळेकर मॅडम पॅनल प्रमुख म्हणून तर पंच न्यायाधीश म्हणून विधिज्ञ जयेश पिलोरे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास बी. ए. तळेकर,अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश एरंडोल, डी.बी.वळवी सरकारी वकील, अॅड.आकाश महाजन, अॅड.जयेश पिलोरे अॅड. अजिंक्य काळे, मिनाबाई डोखे रिंगणगाव सरपंच,सुनिल शिंदे उपसरपंच रिंगणगाव, एरंडोल पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शरद बागल,चंद्रशेखर चौधरी ग्रामसेवक रिंगणगाव, सदस्य भानुदास मते,नकुल सपकाळे,समाधान महाजन, शब्बीर पटेल,कडू महाजन, तांदळे भाउसाहेब, फकीरा वाघे, रामदास शेळके व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. न्यायालयीन कर्मचारी संदीप हरणे,अंकित पुराणीक,नितीन बेडिस्कर, पो.काॅ. धर्मेंद ठाकूर हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमांस मोठया संख्येने ग्रामस्थमंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!