रमजान ईद ही चंद्र दर्शन झाल्यावर रूअते हिलाल च्या निर्णया नुसार साजरी करण्यात येईल. रमजान ईद च्या कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर – नमाज सकाळी ८.३० वाजता

0



जळगाव (प्रतिनिधि) ईद ची नमाज पठण,प्रवचन व चंदा (वर्गणी) बाबत जळगाव शहरातील सर्व मुस्लिम समाजाला अगोदर माहिती मिळावी व त्यानुसार त्यांनी तयारी करावी म्हणून मुस्लिम कब्रास्थान व ईदगाह ट्रस्ट,अजिंठा चौक,एस टी वर्क शॉप जवळ, जळगाव ची कार्यकारिणीची सभा संपन्न झाली त्यासभेत रमजान इद ची मिनिट टू मिनिट रूप रेषा आखण्यात आली व त्यास मौलाना उस्मान कासमी यांची सुद्धा मान्यता घेऊन ती जाहीर करण्यात येत असल्याचे अध्यक्ष वहाब मलिक व जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

ईद नमाज ची रूपरेषा

सकाळी 8.00 ते 8.15 मुफ्ती अतीकुर रहेमान यांचे उर्दू प्रवचन
8.15 ते 8.25 ट्रस्ट चा आढावा व चंदा(वर्गणी)
8.25 ते 8.30 नमाज ची माहिती सादर करतील
8.30 ते 9.00 मौलाना उस्मान कासमी हे नमाज,दुआ व अरबी खुतबा सादर करतील.

मिनट टू मिनट कार्यक्रम हा वेळे नुसारच होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व ट्रस्ट ला सहकार्य करावे तसेच ईद गाह मैदानावर लहान मुलांना आणू नये असे ट्रस्ट तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!