पोलिस प्रशासनाच्या वतीने ईद निमित्ताने हिंदू मुस्लिम इफ्तार पार्टी चे आयोजन…

अमळनेर (प्रतिनिधी) पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस कवायत मैदानावर आगामी रमजान ईद निमित्त हिंदू मुस्लिम इफ्तार पार्टीचे आयोजन
करण्यात आले होते. यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार डॉ. b एस. पाटील, माजी नगरसेवक राजू संदानशिव, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, मुख्य अधीक्षक प्रशांत सरोदे, संजय चौधरी, अॅड. शकील काजी, शेखा हाजी, हाजी नसीरुद्दीन, मौलाना रियाज, शब्बीर पलावान, राजू शेख, दब्बीर पठाण, फिरोज मिस्त्री, जुबेर पठाण, अझहर सय्यद, गुलाम नबी, आरिफ भाया, आबिद कॉन्ट्रॅक्टर आदिस आणि हिंदू मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर उपस्थित

यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, विद्यमान आमदार अनिल दादा पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले, तर पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी यावेळी बोलताना दोन्ही समाजातील ज्येष्ठांनी तरुणांना आवार घालावा, सोशल मीडियाचा वापर मर्यादेत करा हिंदू मुस्लिम समाजाने एकोप्याने नांदा असे आवाहन केले. यावेळी हिंदू, मुस्लिम, आणि पोलिस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले…