सर्वोत्कृष्ट अधिकारी गटात मुख्याधिकारी विकास नवाळे यांना प्रथम पुरस्कार. मुख्यमंत्रिंच्या हस्ते सन्मानित…

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल नगर परिषदचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांना यंदाचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान (प्रगती) सर्वोत्कृष्ट अधिकारी गटात प्रथम पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सेवेच्या दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुख्याधिकारी विकास नवाळे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ५०००० रुपये पारितोषिक स्वरूपात देण्यात आले.एरंडोल नगर परिषदेतर्फे वसुंधरा पार्क मध्ये दहा हजार झेंडू ,गुलाब व शेवंती या फुल झाडांची तसेच १००० फळझाडांची लागवड करण्यात आली होती. नगर पालिकेने या पार्क मधे आलेले सर्व फुले सईबाई बचतगटास करारनामा करून दसरा व दिवाळीच्या सणापुर्वी विक्रीस दिले होते. या माध्यमातून बचतगटांना स्वयंरोजगाराचा मार्ग उपलब्ध झाला व त्याबदल्यात बचतगटाने स्वच्छता विषयक जनजागृती चे कार्य संपूर्ण एरंडोल शहरात केले. या नाविंन्य पूर्ण संकल्पनेचा सन्मान दि.२१ एप्रिल रोजी सह्याद्रि अतिथी गृहात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. याप्रसंगी सदर पुरस्कार हा एरंडोल नगरपरिषद च्या कर्मचारी यांची मेहनत व एरंडोल शहरातील नागरिकांच्या सहकार्यामळेच मिळाल्याबद्दल प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी सांगितले व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.