गोंदेगाव ग्रामपंचायतला शौचालय व्यवस्थापन पुरस्कार..

जरंडी, (साईदास पवार).सोयगाव तालुक्यातील ग्रामपंचायत गोंदेगावने शौचालय व्यवस्थापनात जिल्ह्यात अव्वल ठरल्या मुळे गोंदेगाव ग्रामपंचायतला सोमवारी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त स्व आबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन जिल्हास्तरीय पुरस्कारा ने गौरविण्यात आले
जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते हा पुरस्कार माजी सरपंच सौ वनमाला निकम सरपंच ज्योती नगरे यांना प्रदान करण्यात आला आहे गोंदेगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच सौ वनमाला निकम यांनी सन २०२१ मध्ये गावात शौचालय व्यवस्थापन साठी गावाच्या बाहेर शौचालय उभारले होते सदर शौचालय हे जिल्ह्यात मॉडेल शौचालय ठरले होते त्यावरून या ग्रामपंचायतीला स्व आबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन जिल्हास्तरीय पुरस्कारा साठी पात्र करण्यात आले आहे
यावेळी जि. प. संभाजीनगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, सोयगाव प. स.चे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, विस्तार अधिकारी बी टी साळवे साहेब, brc चे सर्व कर्मचारी, ग्राम विकास अधिकारी श्रीकांत पाटिल सरपंच, उपसरपंच गौरव बिंदवाल, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी चौधरी गसर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते….