पुलाखाली सापडला तरुणाचा मुर्तदेह..घातपात झाल्याचा संशय…

अमळनेर ( प्रतिनिधि ) तालुक्यातील दहिवद औरंगपूर येथील एका तरुणाचा गावापासून पाच किमीवर जळगाव रस्त्यावरील एका पुलाखाली संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना २३ रोजी सकाळी उघडकीस आली.
मूळ औरंगपूर ता अमळनेर येथील प्रवीण पांडुरंग पाटील वय ३२ हा सुरत येथे कामाला असून तो आणि त्याचा भाऊ आपल्या आजीची घागर भरण्यासाठी गावी आलेले होते. २२ रोजी रात्री ११ वाजता त्याला कोणाचा तरी फोन आला म्हणून तो घरी पत्नीला मी बाहेर जाऊन येतो असे सांगितले. मात्र त्यांनतर त्याचा फोन बंद होता. तो घरीच आला नाही. सकाळी म्हसले गावाजवळ जळगाव रस्त्यावरील पुलाच्या खाली तो मृत अवस्थेत आढळून आला. लोणे चे पोलीस पाटील पुना रामभाऊ पाटील यांनी पोलीस स्टेशनला कळवल्यावरून पोलीस निरीक्षक विजय शिंदे ,रवींद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी , राहुल पाटील यांनी पंचनामा केला. डॉ प्रकाश ताळे यांनी शवविच्छेदन केले. त्यात प्रवीण याच्या डोक्याला मार लागला असून त्याच्या डाव्या बाजूच्या बरगड्या तुटून फुफुसात रक्त जमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला असे दिसून आले. प्रथमदर्शनी त्याचा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर त्याला कोणीतरी दोन जण मोटरसायकलवर घ्यायला आले होते. म्हणून त्याचा घातपात झाला असावा असा संशय व्यक्त केला आहे. पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
मयत प्रवीण याच्या पश्चात आई ,वडील , पत्नी व लहान मुलगा असा परिवार आहे.