तहान भागविणे हे पुण्याचे कार्य – पोलिस अधिक्षक, एस राजकुमार. ईद च्या शुभ मुहूर्तावर हाजी गफ्फार मलिक अत्याधुनिक पाणपोई चे लोकार्पण..

जळगाव ( प्रतिनिधि )
मुस्लिम ईदगाह मैदानावर ईदगाह ट्रस्ट च्या सहकार्याने मलिक परिवाराने स्वर्गवासी हाजी गफ्फार मलिक यांचे स्मरणार्थ अत्याधुनिक पाणपोई चे निर्माण केले असून रमझान इद च्या शुभ मुुहर्तावर जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एस राजकुमार

व प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या शुभ हस्ते फीत कापून व पाणी पिऊन पाणपोई चे लोकार्पण करण्यात आले.
सर्व प्रथम ट्रस्ट तर्फे हाजी गफ्फार मलिक हे ट्रस्ट चे अध्यक्ष असताना त्यांनी पाणपोई या ठिकाणी का असावी या बाबत चर्चा करून तिचे महत्व विषद केल्याचा प्रसंग जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी सांगितला व त्या प्रसंगा नुसार मलिक परिवाराने हे पाऊल उचलत स्वखर्चाने ही पाणपोई बांधून दिल्याचे उपस्थितां समोर मांडले.
या वेळी पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी तहानलेल्याची तहान भागविणे चे महत्व विषद करून त्यांनी मलिक परिवाराचे व खास करून वहाब मलिक,एजाज मलिक,रहीम मलिक, नदीम मलिक व जफर शेख यांचे अभिनंदन केले.
या लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रवादीचे रवींद्र भैय्या पाटील,अशोक लाडवंजारी, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप विभागीय अधिकारी संदीप गावित,पो उप अधीक्षक कुलकर्णी, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे सह वहाब मलिक,एजाज मलिक,रहीम मलिक, नदीम मलिक, जफर शेख तसेच ट्रस्ट चे फारुक शेख,अनिस शाह,ताहेर शेख,मुकिम अहमद, व मलिक परिवारातील हाजी गफ्फार मलिक यांचे नातू,पणतू यांची विशेष उपस्थिती होती.