सोयगाव तालुक्यात एप्रिल हिटचा तडाखा—जरंडीतील मेंढपाळ उष्माघाताने अत्यवस्थ—

जरंडी, (साईदास पवार) सोयगाव सह तालुक्याला सोमवारी एप्रिल हिटचा तडाखा बसला आहे या उन्हाच्या तडाख्यात जरंडी शिवारातील मेंढपाळाच्या पंधरा वर्षीय मुलगा अत्यवस्थ होवून उष्माघाताचा त्रास जाणवू लागला होता त्यांचेवर खासगी वैद्यकीय सूत्रांनी उपचार केले आहे
सोयगाव तालुक्यात सोमवारी उन्हाची तीव्रता गंभीर झाली होती महसूल प्रशासनाकडे तापमानाची ४० अंश सेल्सियास इतकी उच्चांकी तापमानाची शनिवारी नोंद झाली होती सोयगावात तीन दिवसांपासून विक्रमी तापमानाची नोंद होत आहे सोयगाव तालुका जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने जळगावच्या विक्रमी तापमानाचा फटका सोयगाव तालुक्याला बसत आहे दरम्यान सोमवारी दुपार नंतर वाढत्या उन्हामुळे सोयगाव तालुक्यात शांतता झाली होती उन्हामुळे शहरवासीयांना उन्हाच्या झळा बसल्या होत्या त्यामुळे सोयगाव सह ग्रामिण भागात सोमवारी जनजीवन विस्कळीत झाले होते दरम्यान जरंडी शिवारात उन्हात मेंढ्या चारणार्या दिगंबर गंगाराम तांबे या पंधरा वर्षीय बालकाला अचानक अस्वस्थ वाटून तो उष्माघाताने अत्यवस्थ झाला होता त्यांचेवर तातडीने खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले उष्माघाता मुळे या पंधरा वर्षीय मुलाची प्रकृती अत्यवस्थ झाल्या ची माहिती खासगी वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे दरम्यान (ता.२४) पहाटे नऊ वाजेपासून उन्हाचे चटके जाणवू लागल्याने सोयगाव तालुक्यात उन्हामुळे अंगाची लाही लाही झाली होती
याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास सोनवणे यांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी ऊन सावली असे न करता उन्हाच्या तडाख्यात घराबाहेर मिघु नये तसेच उन्हातून घरी आल्यावर थंड पाण्याने हातपाय स्वछ करावे उन्हात जास्त वेळ थांबू नये असे आवाहन तालुका वासीयांना केले आहे…