अवकाळीच्या पावसाने मक्याला फुटले कोंब;सोयगाव तालुक्यातील नुकसानीची स्थिती गंभीर..

जरंडी (साईदास पवार)…सलग ४८ तासात दोन वेळा अवकाळीच्या अतिवृष्टीचा तडाखा दिलेल्या सोयगाव तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळीच्या पावसाने काढणी पश्चात कापणी केलेल्या मक्याला कोंब व तुरे फुटल्याचा खळबळ जनक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे त्यामुळे रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळीच्या अतिवृष्टीचा फटका सोयगाव परिसरातील दहा गावांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे
सोयगाव परिसरात रविवारी सायंकाळी व त्या आधी शनिवारी सलग दोन दिवस अवकाळीच्या अतिवृष्टी ची नोंद शासन दरबारी झाली आहे रब्बीच्या हंगामातील काढणी साठी शेतात झाकून ठेवलेल्या मक्याची पिकं या अवकाळीच्या अतिवृष्टीचा पावसात भिजल्याने मंगळवारी या पिकांना कोंब फुटून उभ्या मका पिकांवर तुरे आले आहे दरम्यान सोयगाव परिसरात जरंडी, निंबायती शिवारात हा प्रकार मोठ्या प्रमाणावर उघडकीस आला आहे त्यामुळे या भागात मक्याचे मोठे नुकसान झाले आहे निंबायती शिवारात राहुल गीसावी,हरी पाटील आणि यशवंत जाधव या तीन शेतकऱ्यांच्या शेतात पंढ6 एकर वर मक्याची पिके झाकून ठेवली होती मात्र रविवारी झालेल्या अतिवृष्टीचा पावसात या मक्याला कोंब फुटले आहे दरम्यान सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसात दोन हजार सहाशे तीन हेक्टरवरील मका पिकांना अवकाळी चा फटका बसला आहे त्यामुळे रब्बीच्या हंगामात सोयगाव तालुक्यात मक्याचे उत्पन्न शून्यावर आले आहे सीयगाव परिसरात सोयगाव,कंकराळा, माळेगाव ,पिंप्री,रावेरी, जरंडी, निंबायती
बहुलखेडा,कवली, निमखेडी, उमर विहिरे,तिखी ,या बारा गावांना अवकाळीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानी चे पंचनामे हाती घेण्यात आली आहे मक्या सोबत ज्वारी बाजरी सूर्यफूल गहू हरभरा या रब्बीच्या पिकांनाही तडाखा बसला आहे त्यामुळे अचानक आलेल्या अवकाळीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे
——पंचनामे होतात पण मदत कधी
सोयगाव तालुक्यात मार्च ते एप्रिल पर्यंत झालेल्या अवकाळीच्या नुकसानीचे आतापर्यंत एक हजार पाचशे पंचवीस हेक्टरवरील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांची पंचनामे पूर्ण झाले आहे यातील मार्च अखेरीस पर्यंत पंचनामे पूर्ण झालेल्या ८२६ बाधित शेतकऱ्यांसाठी ,८७ लाख रु मदतीचा निधी प्राप्त झाला होता परंतु सदर अवकाळीच्या नुकसानीचा निधी अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयात तांत्रिक अडचणी अभावी अडकून आहे त्यामुळे नुकसानी चे पंचनामे होतात परंतु निधी कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे….