साहेब घेतलेला निर्णय मागे घ्या. आमदार अनिल पाटलांचे शरद पवारांना साकळे,आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा..

0

अमळनेर (प्रतिनिधि )-शरदचंद्र पवार यांनी निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी अमळनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादी चे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी त्यांना साकळेच घातले असून निर्णय मागे न घेतल्यास आमदारकीचा राजीनामाच देणार असा इशारा त्यांनी दिला आहे.
या निर्णयाने अमळनेर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. यासंदर्भात अनिल पाटील यांनी शरदचंद्र पवार यांना लेखी निवेदन दिले आहे,यात म्हटले आहे की आपण “लोक माझे सांगाती” या पुस्तकाच्या लोकापर्णाच्या कार्यक्रमावेळी आपल्या भाषणादरम्यान आपण राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केलात. गेल्या 6-7 दशकांपासून राजकीय कारकिर्दीत आपण विविध पदे भुषविली आहे. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, कृषी मंत्री, उद्योग मंत्री तसेच दि. 10/06/1999 ते आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात. गेल्या 60 वर्षातील आपले सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील आपले योगदान संपूर्ण देशाने बघीतले आहे तसेच महाराष्ट्र राज्य व देशहिताचे असे अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत, हे संपूर्ण देश विसरू शकणार नाही. आज आपण अचानक घेतलेला निर्णय संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह देशाला राजकीय धक्का देणारा आहे, त्यामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जो आपल्या पक्षाच्या विचारधारेवर, व आपल्या नावाच्या ताकदीवर सन 2019-24 सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत आमदार म्हणून निवडून आलो. परंतु, आपण घेतलेल्या निर्णयामुळे माझ्यासह लाखो कार्यकर्ते खचून गेले आहेत.तरी, आदरणीय साहेब, आज आपण राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्तीबाबतचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा अन्यथा मला माझ्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा मा. विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्याची परवानगी द्यावी अशी
अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!