एरंडोल येथील फिजिओथेरपिस्ट डॉ. जुमाना बोहरी यांचा कास (सातारा) अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग..

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल येथील बोहरी फिटनेस सेंटरच्या संचालिका डॉ. जुमाना बोहरी यांनी दि. 30 एप्रिल रोजी सातारा येथील युनेस्को ने

जाहीर केलेल्या जागतिक वारसा यादीतील कास पठार या ठिकाणी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत वैद्यकीय सहायता गटाचे नेतृत्व केले.सदर स्पर्धा ही 50 किलोमीटर आणि 65 किलोमीटर अशा दोन अंतरांसाठी आयोजित करण्यात आली होती. उन्हाच्या वाढलेल्या प्रमाणामुळे स्पर्धेची वेळ रात्री 12 वाजता ते सकाळी 9 वाजे दरम्यान करण्यात आली होती. मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना वैद्यकीय सहायता पुरविणे, त्यांच्यावर तात्काळ उपचार करणे यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समूहाचे नेतृत्व डॉ. जुमाना बोहरी यांनी केले. डॉ जुमाना बोहरी यांना सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले.
डॉ जुमाना बोहरी या सातत्याने शरीर व आरोग्य निरोगी राहण्यासाठी व्यायाम करावा यासाठी जनजागृती करीत असतात. त्या यापूर्वी देवास, जळगाव, मुंबई येथे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत यशस्वी झाल्या आहेत. मात्र या वेळी त्या वैद्यकीय सेवा देत स्पर्धेत सहभागी झाल्यात त्यांच्या या निर्णयाचा आणि कार्याचे परिसरातील मान्यवर लोकांकडून कौतुक करण्यात येत आहे.