धमकी देत अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या एकास 20 वर्ष कारावासाची शिक्षा

0


अमळनेर (प्रतिनिधि) आत्महत्या करून त्यात तुझ्या आईवडिलांना फसवून देईल अशी धमकी देत अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या एकास अमळनेर न्यायालयाने 20 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
दीपक रविंद्र भिल वय 21 वर्ष रा.अकुलखेडा ता.चोपडा याने गावातील एका 14 वर्षीय तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात अडकविले होते.त्यात दि.5 फेब्रुवारी 2020 रोजी तिला घरातून पळवून नेले होते.याबाबत पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून तरुणावर चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस उपनिरीक्षक तुरनर रामेश्वर सखाराम,पोलीस निरीक्षक विनायक लोकरे,विजया वसावे,महिला पोलीस विद्या इंगळे या पथकाला सदर तरुणी ही देवळाली ता.करमाळा जि.सोलापूर या ठिकाणी मिळून आली होती.तरुणाने जर माझ्यासोबत लग्न नाही केले तर मी जीवाचे बरेवाईट करेल आणि त्यात तुझ्या आई वडिलांना अडकवेल अशी धमकी दिल्याने पीडित तरुणी नाईलाजाने तरुणासोबत गेली होती.त्याठिकाणी तरुणाने पीडित मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.असे पीडित मुलीने जबाबात म्हटले सदर खटल्यात 14 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.यात पीडित मुलीची साक्ष,ग्राम विकास अधिकारी यांचा पीडित मुलीच्या वयाबाबत साक्ष,डॉ नरेंद्र पाटील व पीडित मुलीची आई यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.यावरून जिल्हा न्यायाधीश 2 पी आर चौधरी यांनी आरोपीस भादवी कलम 363,376 अ नुसार सात वर्षे तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 4 नुसार 20 वर्ष व कलम 8 नुसार 3 वर्ष अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर खटल्याचा सरकारी वकील शशिकांत पाटील यांनी युक्तिवाद केला.तर पैरवी अधिकारी उदयसिंग साळुंखे,हिरालाल पाटील,नितीन कापडणे,राहुल रणधीर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!