प्रेरणा मराठे हिला राज्यस्तरीय शालेय जुडो स्पर्धेत कांसयपदक..

एरंडोल (प्रतिनिधी )एरंडोल येथील गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेची महिला खेळाडू कु.प्रेरणा अनिल मराठे हिला राज्यस्तरीय शालेय जूडो स्पर्धेत कांस्यपदक मिळाले.
दि.१८ ते २० एप्रिल दरम्यान अमरावती या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय १९ वर्ष आतील महिला शालेय कुस्ती स्पर्धेत एरंडोल येथील गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेची व डी. डी.एस.पी.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया ची खेळाडू कु.प्रेरणा अनिल मराठे हिला ६३ किलो वजन गटात कांस्यपदक मिळाले आहे.सदर स्पर्धेसाठी तिला भानुदास आरखे ,अनिल मराठे,प्रा.मनोज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल प्रेरणाचे भाजप जनजाती क्षेत्र प्रमुख ॲड.किशोर काळकर,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,उद्योजक संजय काबरा,महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनिल देशमुख व कुस्तीगीर संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.