२५ हजार ५०० रुपये परत करणाऱ्या लॉन्ड्री चालकाचा नागरिकांनी केला स्तकार

अमळनेर(प्रतिनिधी)
शहरातील पिंपळे रस्त्यावर असलेल्या लॉन्ड्रीचालकाने कपड्यांमध्ये सापडलेले २४ हजार ५०० रुपये परत केल्यामुळे कॉलनीतील नागरिकांनी प्रामाणिकपणा दाखविणाऱ्या लॉन्ड्री चालकाचा सत्कार केला.
पिंपळे रस्त्यावर विवेकानंद नगरजवळ अनिल वाघ हे आपला लॉन्ड्री चा व्यवसाय करतात.जवळच्या कॉलनीतील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक एन.एन.पाटील (गांधलीकर) यांचे कपडे अनिल वाघ यांच्याकडे प्रेसला दिले होते. एकदा त्यांच्या कपड्यांच्या खिशात १६ हजार रुपये होते वाघ याने पाटील सरांना पैसे परत केले होते. २९ एप्रिल शनिवारी पुन्हा एकदा ८५०० रुपये पुन्हा एकदा खिशात सापडले ते देखील अनिल वाघ यांनी सरांच्या घरी जाऊन परत केले.वाघ याला देऊ केलेले बक्षीस देखील त्यांनी घेतले नाही. २४५०० एवढी रक्कम मिळाली असताना देखील अनिलला मोह झाला नाही.कॉलनीतील नागरिकांना ही बाब समजल्याने एन.एन.पाटील यांच्या घरी त्याचा सत्कार करण्यात आला. वाघ याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी ए.डी.भदाणे,नगरसेवक यज्ञेश्वर पाटील,अशोक पाटील बळवंत पाटील, विलास बोरकर,दिलीप पाटील तसेच कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.