*श्री. संत सद्गुरु सखाराम महाराज यात्रोत्सवात प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले.

0

अमळनेर ( प्रतिनिधि )
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव चे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत अंमळनेर येथील श्री. संत सद्गुरु सखाराम महाराज यांच्या यात्रा महोत्सवा निमित्त बोरी नदी पात्रात दिनांक ०६/०५/२०२३ सकाळी ६:० वाजता प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी तीन घंटा गाड्या भरून प्लास्टिक गोळा करण्यात आले. विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे यांनी प्लास्टिक प्रदूषणात सर्वात मोठा वाटा भारताचा आहे. तब्बल १३ दशलक्ष टन एवढा सर्वाधिक प्लास्टिक कचरा भारतात विना प्रक्रिया टाकला जातो, या आपत्ती बद्दल आपले विचार व्यक्त केले. या उपक्रमात खानदेश शिक्षण मंडळाचे व्हाईस चेअरमन श्री. प्रदीप कुंदनलाल अग्रवाल, आधिसभा सदस्य प्रा.डॉ.संदीप नेरकर, जॉईंट सेक्रेटरी धीरज वैष्णव, उपप्राचार्य जयवंत पटवर्धन, उपप्राचार्य गुलाब निकम. उपप्राचार्य पराग पाटील, जूनियर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. अमृत अग्रवाल , प्रा.डॉ.ए.जे.पाटील, प्रा.अवित पाटील, प्रा डॉ. हेमंत पवार प्रा.एस एम राजपूत,प्रा.भाग्यश्री जाधव, धनदाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य. किशोर पाटील, चोपडा समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ.राहुल निकम, समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील प्राचार्य. पी एस पाटील. व प्रा.कविता पाटील तत्त्वज्ञान केंद्राचे संचालक प्रा. डॉ. दिलीप भावसार माजी आधिसभा सदस्य दिनेश नाईक श्री.राजेंद्र निकुंभ, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय येथील डॉ. एस‌ बी. सावंत, किसान महाविद्यालयातील पारोळा डॉ. प्रदीप ॵजेकर. मारवाड महाविद्यालयातील डॉ.पवन पाटील डॉ. दिलीप कदम. दिनेश अग्रवाल, अथर्व करंजे तसेच योगा ग्रुपच्या महिला भगिनी उर्मिला अग्रवाल ,सुनिता करंजे,मीना कुमारी अग्रवाल, प्रा.शीला पाटील , अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट भारती अग्रवाल, ज्योती भावसार, वनश्री अमृतकार,सुरेखा खैरनार, सोनल गोसलिया, नगर पालिका प्रशासनाचे श्री. संजय चौधरी,श्री.हैबत पाटील श्री. दिनेश जोशी,कर्मचारी वुंद
यांचे अनमोल सहकार्य लाभले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जळगाव जिल्हा रा.से.यो समन्वयक प्रा. डॉ.मनीष करंजे, विभागीय समन्वयक डॉ. संजय शिंगाणे, प्रा.डॉ. जगदीश सोनवणे विद्यार्थी, विद्यार्थिनी स्वयंसेवक स्वयंसेविका,यांनी परिश्रम घेतले या उपक्रमाबद्दल श्री. संत सद्गुरु प्रसाद महाराज यांनी सर्वांचे कौतुक व अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!