ग्रामपंचायत पोट निवडणूक; दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात; दोघांची माघार

जरंडी (साईदास पवार)..सोयगाव तालुक्यातील तीन ग्रामपंचायत च्या पोट निवडणुका साठी सोमवारी नामनिर्देशन पत्र माघार घेण्याच्या अंतिम दिवशी( ता.०८) नांदगावतांडा व दस्तापुर या दोन ग्रामपंचायती साठी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र माघार झाल्या मुळे या दोन ग्रामपंचायतच्या दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असून कवली ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नव्हते त्यामुळे या ग्रामपंचायती साठी मतदान होणार नसल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली आहे
सोयगाव तालुक्यात तीन पैकी नांदगावतांडा व दस्तापुर या दोन ग्रामपंचायतिच्या नांदगाव तांड्यातून सुभानखान पठाण व दस्तापुर ग्रामपंचायत मधून यनुबाई मधे या दोघांनी सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेतले त्यामुळे नांदगाव तांडा गोविंद परदेशी,प्रवीण राठोड आणि दस्तापुर ग्रामपंचायत मधून अनिता वाघ सपना भदाणे या चौघांमध्ये सरळ लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे….दरम्यान कवली ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नव्हते त्यामुळे कवली ग्रामपंचायतीची पोट निवडणूक निरंक राहणार आहे माघारी दरम्यान तहसीलदार रमेश जसवंत निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार हेमंत तायडे विजय कोळी सचिन ओहोळ आदींनी पुढाकार घेतला होता
—–सोमवारी माघारी नंतर चारही उमेरावरांना चिन्ह वाटप करण्यात आले त्यामुळे दोन ग्रामपंचायत च्या दोन जागांसाठी (ता.१८) मतदान होणार आहे त्यामुळे पोट निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे……..